वैताग, करुणा आणि उदासी या तीन पेड्यांची पाऱ्यासारखी कविता
वैताग, करुणा आणि उदासी या तीन पेड्यांची वेणी बांधावी आणि चिमुरडी ‘अच्छा’ म्हणत कुठे दूर खेळायला निघूनही जावी, तशी कविता आहे विठ्ठलची. ती हातात येणारी नाही. ती पाऱ्यासारखीच आहे. त्या पाऱ्याचा स्पर्श, त्याची चकाकी, त्याचं ओघळणं याचा आस्वाद घेणं मात्र आपल्याला शक्य आहे. आणि हे काम आनंदाचं, मैत्रीचं आणि समृद्ध करणारं असं आहे.......